कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2022 14:29 IST2022-11-08T14:28:23+5:302022-11-08T14:29:01+5:30

अब्दुल सत्तार यांचा माफीनामा नको त्यांच्या राजीनामा घ्या, मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

Block the path of nationalists in welfare; No apology, resign, NCP demands | कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी

कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी

कल्याण-कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात टीका करताना अपशब्दांचा वापर केल्याने राज्यभरात राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर आज कल्याण मध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, माजी नगरसेवक कुणाल पाटील, पदाधिकारी रमेश हनुमंते, उमेश बोरगावकर, दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

यावेळी अब्दुल सत्तार यांचा माफीनामा नको त्यांच्या राजीनामा घ्या, मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. अब्दुल सत्तार विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीकडून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आले. आंदोलनात महिला कार्यकर्ता देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

Web Title: Block the path of nationalists in welfare; No apology, resign, NCP demands