ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप
By मुरलीधर भवार | Updated: July 23, 2022 20:04 IST2022-07-23T19:59:24+5:302022-07-23T20:04:04+5:30
सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे.

ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप
कल्याण- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिअल डेटा तयार केला होता. आज आमचे सरकार नसल्याने त्याचे सगळे श्रेय भाजपा सरकार घेत आहे. ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज येथे केले.
हिराचंद मुथा कॉलेजच्या वतीने व्हॉट इज ओबीसी? या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्य वैशाली गोखले, ठाणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जयदीप सानप, निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्र तायडे आदी मान्यवर उपस्थीत होते.
अध्यक्ष माळी यांनी सांगितले की, आघाडी सरकारने बांठिया आयोजागी स्थापना केली. बांठिया आयोगाने काही जिल्ह्यांत शून्य, १०, १५ आणि २० टक्के आरक्षण सुचविले आहे. त्यांचे हे सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यात काही त्रूटी आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. या त्रूटी आघाडी सरकारशिवाय अन्य कोणतेही सरकार दूर करु शकत नाही.
भाजप प्रणित केंद्र सरकारने खाजगी करण केले आहे. सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे. सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानसारखी स्थिती आपल्या देशात उद्भवू शकते, अशी शक्यताही माळी यांनी यावेळी व्यक्त केली.