वीज बिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विविध ठिकाणी भाजपचे धिक्कार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 17:07 IST2020-11-23T17:07:42+5:302020-11-23T17:07:54+5:30

 उल्हासनगर कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर जवळील वीज महावितरण कार्यालया समोर सोमवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह घोषणाबाजीत धिक्कार आंदोलन सुरू केले.

BJP's condemnation agitation at various places in Ulhasnagar to protest against increase in electricity bill | वीज बिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विविध ठिकाणी भाजपचे धिक्कार आंदोलन

वीज बिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विविध ठिकाणी भाजपचे धिक्कार आंदोलन

उल्हासनगर : वीज बिल वाढीच्या निषेधार्थ भाजपाने शहरातील विविध ठिकाणी धिक्कार आंदोलन करून शिवसेना आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वाधारीया, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी यांच्या नेतृत्वाखाली धिक्कार आंदोलन पार पडले असून वीज बिल माफ करण्याची मागणी केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर जवळील वीज महावितरण कार्यालया समोर सोमवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह घोषणाबाजीत धिक्कार आंदोलन सुरू केले. तसेच शहरातील गोवेली म्हराळगांव, कॅम्प नं-१ बस स्टॉप, नेहरू चौक, खेमानी ओ टी सेक्शन, १७ सेक्शन, नागरानी मंदिर, गांधी रोड, प्रभाराम मंदिर वीज कार्यालय बाहेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धिक्कार आंदोलन केले. ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी केली आहे.

Web Title: BJP's condemnation agitation at various places in Ulhasnagar to protest against increase in electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.