उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:11 IST2021-08-03T17:10:29+5:302021-08-03T17:11:52+5:30
कल्याण ग्रामीण भागातील मलंग गडाच्या नजीक करवले आणि उसाटणे या परिसरात उल्हासनगर महापालिकेच डंपिंग ग्राऊंड होणार आहे.

उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर
कल्याण-
कल्याण ग्रामीण भागातील मलंग गडाच्या नजीक करवले आणि उसाटणे या परिसरात उल्हासनगर महापालिकेच डंपिंग ग्राऊंड होणार आहे. उसाटणे येथे जागेचे सिमांकन करण्यासाठी गेलेल्या अधिका:यांना सिमांकन करण्यास भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला. उसाटणो या ठिकाणी शाळा आहे. त्याच्या जवळ डंपिंग ग्राऊंड केले तर शाळेचे काय करणार असा सवाल गायकवाड यांनी अधिकारी वर्गास विचारला.
काही दिवसापूर्वीच भाजप आमदार गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्तांशी याबाबत चर्चा केली होती. गावक:यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल असे सांगण्यात होते. असे असताना उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन डंपिंगच्या जागेचे सिमांकन करण्यासाठी उसाटणे गावात पोहचले. उसाटणो गावात शाळा आहे. त्याच्या शेजारीच डंपिंग ग्राऊंड केल्यास शाळेत शिकणाऱ्या विद्याथ्र्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
शाळेचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणची जागा सोडून पुढची जागा डंपिंग साठी निश्चीत केली पाहिजे. शाळेच्या नजीक डंपिंग ग्राऊंड करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. मुलांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करता काही एक निश्चीत न करता सिमांकन कशाच्या आधारे केले जात आहे असा सवाल गायकवाड यांनी अधिकारी वर्सास विचारला. त्याचबरोबर तु्म्हाला सत्तेचा माज आला असेल ना, तर मी माज काढणार. मी घाबरत नाही कोणाला आणि सत्ताधा:यांना असा चांगचाच दम गायकवाड यांनी अधिकारी वर्गास भरला.
राजकारण करुन दडपशाही करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. चुकीचे कामे का करता. उल्हासनगर महापालिकेच्या सरकारी जागा आहेत. तिथे हा प्रकल्प राबवा. त्याठिकाणच्या बिल्डरांकडून पैसे गोळा करुन हा डंपिंग ग्राऊंड गावक:यांच्या माथी मारत आहात याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले. गायकवाड यांनी अधिका:यांना जे काही सुनावले त्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.