कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

By मुरलीधर भवार | Updated: September 28, 2023 16:43 IST2023-09-28T16:41:10+5:302023-09-28T16:43:20+5:30

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना केक भरवत प्रतिमांचे विसर्जन केले.

birthday movement of MNS pits in Kalyan, cut cake in pit near Durgadi Ganesh ghat | कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असा आश्वासन दिले मात्र गणरायाचा आगमनी खड्डातून झालं तर हे विसर्जनाच्या दिवशी देखील पप्पांना या खड्ड्यातूनच परतीचा प्रवास करावा लागत आहे. खड्डे बुजविले गेले नसल्याने  मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मनसेने आज दुर्गाडी किल्ला जवळील गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात केक कापत खड्डे का बर्थडे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना केक भरवत प्रतिमांचे विसर्जन केले. जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला . 

यावेळी  मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितले की, गणेश विसर्जनापूर्वी शहरातील रस्ते खड्डे मुक्त केले जातील असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते . रस्ते बुजविण्याच्या टेंडरमधून किती मलाई निघते याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.. त्यामुळे अधिकाऱ्यांचा ठेकेदारावर अंकुश नाही . अधिकारी ऑफिसमध्ये बसून आदेश काढतात, रस्त्यावर फिरून खड्डे बुजजविले गेले आहेत की नाही याची  प्रत्यक्ष पाहणी करीत नाही. रस्त्यावरील खडडयांचे सर्वेक्षण केले जात नाही.  किती खड्डे आहेत. त्यापैकी किती खड्डे बुजविले  याची साधी माहिती त्यांच्याकडे नसते.  

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जातील असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी खड्डे बुजविण्याची डेडलाईन १३ सप्टेंबर रोजी दिली होती. ही डेडलाईन उलटून गेली. गणेशाचे आगमन ख्डे मय रस्त्यातून झाले. तसेच गणेशाची विसर्जनही खड्यातून झाले.  दुर्गाडी गणेश घाट हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा विसर्जन घाट आहे. या घाटाकडे जाणाऱ््या रस्त्यावरील खड्डेही बुजविले गेले नसल्याने संतप्त मनसे सैनिकानी आंदाेलन करीत प्रशासनाचा निषेध केला.

 

Web Title: birthday movement of MNS pits in Kalyan, cut cake in pit near Durgadi Ganesh ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.