मोठी बातमी! डोंबिवलीत ३ मजली इमारत कोसळली,अग्निशमन घटनास्थळी पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:51 IST2023-09-15T17:49:31+5:302023-09-15T17:51:51+5:30
डोंबिवली येथे आदिनाथनगरमध्ये ३ मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! डोंबिवलीत ३ मजली इमारत कोसळली,अग्निशमन घटनास्थळी पोहोचले
डोंबिवली येथे आदिनाथनगरमध्ये ३ मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
इमारत धोकादायक असल्याची महापालिकेनं नोटीस दिली होती. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना स्थळावर अग्निशमन दल पोहोचले आहे. बचाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.
ही इमारत धोकादायक असल्याने सकाळपासूनच रुम खाली करण्याचे काम सुरू होते. अचानक पाच वाजता ही इमारत कोसळली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी, डोंबिवली पूर्वेकडील जूना आयरे रोड येथील आदिनारायण तळमजला अधिक तीन मजली इमारत कोसळली. दोन जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धोकादायक इमारत होती. सात ते आठ खोल्या होत्या. बहुतांश जणांनी रुम खाली केल्या होत्या, पण दोघेजण त्याठिकाणी वास्तव करीत असल्याची माहिती मिळत आहे.