भिवंडी येथे आरपीएफ टीमने ई-तिकिट दलालास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:06 IST2021-02-11T19:06:34+5:302021-02-11T19:06:46+5:30
११ वैयक्तिक ओळखपत्र, लॅपटॉप, मोबाइल, सिपीयू जप्त

भिवंडी येथे आरपीएफ टीमने ई-तिकिट दलालास पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: ई-तिकिटांच्या विरोधात मोहिमेदरम्यान भिवंडी रोड आरपीएफच्या पथकाने दोन दलालांना पकडले. ते अवैधपणे ११ वैयक्तिक आयडीचा उपयोग करून रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांच्या विक्रीत गुंतले होते.
त्यांच्याकडील सीपीयू मॉनिटर, एक मोबाईल, ३ लॅपटॉप सह ३० हजार ७२५ रुपये किमतीची २० प्रवासाची ई-तिकिटे आणि ४० हजार ५६२ रुपये किमतीची ३८ मागील प्रवासाची ई-तिकिटे असे एकूण ७१ हजार २८७ रुपये जप्त करण्यात आले. रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत चौधरी यांच्या नेतृत्वात, अनवर शहा, विनोद राठौड, नीलकंठ गोरे आदींनी ही कामगिरी केली.