“समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते”; कल्याणमध्ये बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 22:14 IST2022-06-25T22:12:58+5:302022-06-25T22:14:13+5:30
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नागरिक सरसावलेत.

“समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते”; कल्याणमध्ये बॅनरबाजी
कल्याण-एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष उभा राहिलाय. राज्यभरात शिंदे समर्थकानी कुठे शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावलेत .तर कुठे शिवसैनिकांनी शिंदे विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलंय . कल्याण-डोंबिवलीत मात्र शिवसैनिकांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याचे दिसून येते . त्यातच कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नागरिक सरसावलेत .
कल्याणातील नाना सावंत मंडळाने उद्धव ठाकरे यांच्य समर्थनार्थ बॅनर लावलाय .कल्याण पश्चिम सहजानंद चौकात लावण्यात आलेला हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय .आम्ही शिवसैनिक नाही राजकारणी नाही ,या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात चांगले निर्णय घेतलेत , सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे समानार्थ आम्ही बॅनर लावल्याचं या मंडळाचे म्हणणे आहे .
काय लिहलंय बॅनरवर
समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते! उद्धवजी ठाकरे साहेब समर्थक