शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर प्रकरणात आणखी ३ आरोपी फरार; अक्षय शिंदेवर आणखी २ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:58 IST

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली.  त्यानंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम अक्षय शिंदेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले होते. तसेच अक्षय शिंदेच्या आरोपांवरील कलमांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात आता शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही पोलिसांनी आरोपी केलेलं आहे. सध्या तिघेही फरार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. न्यायालयीन कोठडी सुनावताना कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या प्रकरणात कलम ६ आणि २१ वाढवण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यासह अन्य तीन जणांना निलंबित करण्यात आलं होतं. तसेच  पोलीस निरीक्षकावरही कारवाई करण्यात आली होती.

"आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून कोर्टाला तीन आरोपी हवे आहेत. मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे तीन आरोपी कोर्टाला हवे आहेत. कोर्टाने या तिघांनाही आरोपी बनवलं आहे. तसेच अक्षय शिंदेवर मागच्या एफआयआरमध्ये कलम ६ लावण्यात आलं नव्हतं. आमचीही तीच मागणी होती. त्यानुसार पोक्सोनुसार कलम ६ जोडण्यात आलं आहे," अशी माहिती वकिलांनी दिली.  

दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरPoliceपोलिसkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय