शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

शिर्डी एक्स्प्रेसमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 6:53 AM

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी पहाटे आई झाेपेत असताना एका दीड वर्षाच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडला. प्रवाशांनी चोरट्याला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम पठाण (रा. येवला, नाशिक) असे चाेरट्याचे नाव आहे. मुलीला पोलिसांनी तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर शिर्डी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे ही एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या पत्नीला झोप लागली, तर राकेश हे लघुशंकेसाठी गेले होते. दीड वर्षाची सृष्टी आईजवळ असताना तिच्यावर चाेरट्याची नजर गेली. संधी साधून मुलीला उचलून घेत तो तेथून निघाला. काही सतर्क प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला हटकले. तेव्हा ताे धड उत्तर देऊ शकला नाही. त्याचवेळी मुलीच्या आईला जाग आली. तिने मुलगी माझी असल्याचे सांगताच प्रवाशांनी मुलीला चोरून नेणाऱ्यास पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुलीची विक्री करण्याचा डाव?

आरोपी सलीम एक्स्प्रेसमध्ये कुठे चढला, त्याने मुलीवर पाळत ठेवली होती का, मुलीला चोरून तो तिचे पुढे काय करणार होता, कोणाला विकणार होता का, या प्रश्नांभोवती रेल्वे पाेलिस तपास करत आहेत.   त्याने यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी