सहा दिवस उलटूनही जोंधळे यांचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवाल दिल, महापालिकेच्या अग्निशमन दलाला केले पाचारण
By अनिकेत घमंडी | Updated: May 29, 2024 15:13 IST2024-05-29T15:12:34+5:302024-05-29T15:13:37+5:30
कुटुंबियांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा शोधकाम सुरू

सहा दिवस उलटूनही जोंधळे यांचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवाल दिल, महापालिकेच्या अग्निशमन दलाला केले पाचारण
डोंबिवली : अमुदान कंपनीत स्फोट होऊन सहा दिवस पूर्ण झाले तरी देखील मनीषा जोंधळे यांचे पती अद्यापही सापडलेले नाहीत. मनीषा जोंधळे यांचे पती अमुदान कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होते. मात्र स्फोटानंतर ते अद्याप सापडले नाहीत. याबाबत त्याच्या पत्नीना कोणतेही प्रशासन मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी।केला.\
याबाबत जोंधळे यांनी सांगितले की मला तीन मुली असून मला माझे पती हवे आहेत, त्यांना शोधण्याकरता आम्ही प्रयत्न केले मात्र कोणीही इथे देत नव्हते. माझे डीएनए टेस्टचे रिपोर्टही अद्यापही मिळाले नसल्याने कोणताही पुरावा हाती राहिला नाही अशी खंत व्यक्त केली. दरम्यान मनीषा जोंधळे यांच्या मागणीनुसार बुधवारी पुन्हा महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून पुन्हा एकदा शोधकाम सुरू करण्यात आले असून जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या आशा अद्याप कायम आहेत.