भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने माजविली दहशत

By प्रशांत माने | Updated: November 16, 2023 16:27 IST2023-11-16T16:26:32+5:302023-11-16T16:27:40+5:30

निलेशच्या भावाला तीन दिवसांपूर्वी परिसरातील काही तरूणांनी मारहाण केली होती.

angry brother damage auto in area in dombivali | भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने माजविली दहशत

भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने माजविली दहशत

डोंबिवली - भावाला मारलं म्हणून संतापलेल्या भावाने कु-हाड घेऊन रस्त्यावर दहशत माजविल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिमेकडील नेमाडे गल्ली रिक्षा स्टॅण्ड बुधवारी मध्यरात्री २ ते ३ या कालावधीत घडला. यात दोन रिक्षांचे आणि एका दुचाकीचे देखील तोडफोड करीत नुकसान केले आहे. दहशत माजवून तोडफोड करणा-याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. निलेश शिनगारे (वय २६) असे अटक आरोपीचे नाव आहे.

निलेशच्या भावाला तीन दिवसांपूर्वी परिसरातील काही तरूणांनी मारहाण केली होती. हे समजल्यानंतर निलेश संतापला होता. संतापलेला निलेश बुधवारी रात्री दोनच्या सुमारास कु-हाड घेऊन घराबाहेर पडला. त्याने रस्त्यावरील दोन रिक्षांच्या पुढील काचा फोडल्या तसेच एका दुचाकीचे देखील नुकसान केले. दरम्यान एक तरूण हातात कु-हाड घेऊन दहशत माजवित वाहनांची तोडफोड करतोय याची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत निलेशला अटक केली. दरम्यान हातात कु-हाड घेऊन निलेशचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

Web Title: angry brother damage auto in area in dombivali