डोंबिवलीत रेल्वे पुलावर तरुणाला बेदम मारहाण 

By अनिकेत घमंडी | Updated: February 16, 2023 19:07 IST2023-02-16T19:06:43+5:302023-02-16T19:07:00+5:30

डोंबिवलीत रेल्वे पुलावर तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. 

 An incident of brutal beating of a youth took place on the railway bridge in Dombivli  | डोंबिवलीत रेल्वे पुलावर तरुणाला बेदम मारहाण 

डोंबिवलीत रेल्वे पुलावर तरुणाला बेदम मारहाण 

डोंबिवली : घाटकोपर ते डोंबिवली प्रवास करून डोंबिवली स्थानकात उतरलेल्या प्रवाशाला अनोळख्या दोन प्रवाशांनी चोप दिल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी सायंकाळी घडली. यासंदर्भातील तक्रार रेल्वे पोलिसात दाखल करण्यात आली आहे. सागर भिसे (२७) हा अंबरनाथ फास्ट लोकलने घाटकोपर येथून प्रवास करत होता.

 त्यानंतर तो डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे पुलावरून जात असताना त्याच्याकडून चुकून एका प्रवाशाला पे लागला. त्यानंतर त्या प्रवाशाला सॉरी बोलून दोघेही पुढे निघाले. मात्र सागरच्या मागे असलेले दोन इसम सागर यांच्याशी पाय लागण्यावरून हुज्जत घालू लागले. सागरने मी त्यांना सॉरी बोलले आहे. तुम्ही मध्ये का बोलता असा प्रश्न विचारताच त्या दोघांनी सागरला बेदम मारहाण केली. यासंदर्भात सागरने लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. 


 

Web Title:  An incident of brutal beating of a youth took place on the railway bridge in Dombivli