डोंबिवली फूटबॉल स्पर्धेत अंबरनाथ युनाटेड अन् ज्युपिटर अकादमीने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:32 PM2021-12-13T15:32:32+5:302021-12-13T15:33:02+5:30

फूटबॉल खेळातील नामांकित खेळाडून राहूल के. पी. आणि श्रृती नायर हे उपस्थीत होते. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता. 

Ambernath United and Jupiter Academy win the Dombivli football tournament | डोंबिवली फूटबॉल स्पर्धेत अंबरनाथ युनाटेड अन् ज्युपिटर अकादमीने मारली बाजी

डोंबिवली फूटबॉल स्पर्धेत अंबरनाथ युनाटेड अन् ज्युपिटर अकादमीने मारली बाजी

Next
ठळक मुद्देफूटबॉल खेळातील नामांकित खेळाडून राहूल के. पी. आणि श्रृती नायर हे उपस्थीत होते. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता. 

कल्याण - शिवसेनेच्या युवासेनेतर्फे डोंबिवलीतील भाग शाळा मैदानात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या फूटबॉल स्पर्धेत पुरुष गटात अंबरनाथ युनायटेड फूटबॉल संघाने 25 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले. तर महिला गटातून ज्यूपीटर अकादमीने 15 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले आहे.

युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. डोंबिवली प्रिमिअर लीग आणि आयएफसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत मुंबई आपसासच्या परिसरातून पुरुष खेळाडूंच्या 16 टीम तर मुलींच्या 8 टीम स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. फूटबॉल खेळातील नामांकित खेळाडून राहूल के. पी. आणि श्रृती नायर हे उपस्थीत होते. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता. 

याप्रसंगी युवासेनेचे पदाधिकारी दुर्गेश चव्हाण, अशू सिंग, पवन म्हात्रे, स्वप्नील विटकर आदी मान्यवर उपस्थीत होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनी सावंत, अक्षय सोनावणो आणि प्रकाश सोनावणो यांनी परिश्रम घेतले. कोरोना काळात खेळाच्या  स्पर्धाना ब्रेक बसला होता. कोरोना पश्चात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या फूटबॉल स्पर्धेमुळे खेळाडूंचा उत्साह द्वीगुणित झाला आहे. कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंना चांगल्या प्रकारची मैदाने उपलब्ध करुन देण्याची मागणी या स्पर्धेच्या निमित्ताने म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 
 

Web Title: Ambernath United and Jupiter Academy win the Dombivli football tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.