शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरी, बलात्कार, खुनापर्यंत सर्व गुन्हे विशालवर दाखल; पोलिस उपायुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:00 IST

कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, २०१४ सालापासून विशाल याच्या विरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कल्याण : आरोपी विशाल गवळी याच्यावर गेल्या १० वर्षांपासून विविध गंभीर गुन्हे असल्याची माहिती उघड झाली. चोरी, विनयभंग, प्राणघातक हल्ला आणि आता बलात्कार व हत्या, अशा चढत्या भाजणीची विशालची गुन्हेगारी कारकीर्द आहे. 

कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, २०१४ सालापासून विशाल याच्या विरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, एका मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, एकावर प्राणघातक हल्ला, दोन वेळा तडीपारीच्या आदेशाचा भंग आणि आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

प्रत्येक गुन्ह्यात त्याने मिळविलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. किती आरोपींना मानसिक रुग्णाचा दाखला देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी, ठाणे सिव्हिल, मनोरुग्णालय आणि मुंबईतील रुग्णालयांना पत्र देऊन पोलिस माहिती घेणार आहेत.

शिवसेनेकडून पाच लाखांची मदत-  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने पीडित मुलीच्या कुुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात आली. -  ही मदत खासदारांचे स्वीय साहाय्यक अभिजित दरेकर, शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे आणि मल्लेश शेट्टी यांनी मुलीच्या वडिलांकडे सुपूर्द केली.

वनमंत्री गणेश नाईक यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट-  वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी सायंकाळी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. -  कुटुंबीयांच्या मनात भीती आहे. आम्ही त्यांना सांगितले की, चिंता करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आरोपीला योग्य धडा शिकविला जाईल. -  आरोपीने मनोरुग्ण असल्याचा घेतलेला दाखला चुकीच्या पद्धतीने मिळविला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. -  हा दाखला देणारे कोण आहेत याचा शोध घेतला जाईल, असे नाईक म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस