शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला एअर इंडियाकडून फोन आला नाही, पण...', रोशनी सोंनघरेच्या मामाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:52 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात डोंबिवलीतील रोशनी सोंनघरेचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्सचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीतील रहिवासी रोशनी सोंनघरे(२७) हिचाही समावेश आहे. रोशनी दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. लहानपणापासूनच तिचे एअर हॉस्टेस बनण्याचे स्वप्न होते. पण, याच स्वप्नाने तिचा घात केला.

एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणारी रोशनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील होती. इंस्टाग्रामवर तिचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. दरम्यान, विमान अपघातात तिचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, रोशनीला लहानपणापासून एअर हॉस्टेस बनायचे होते. १० बाय १० खोलीतून तिचा प्रवास सुरू झाला होता. रोशनीचे वडील एका कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करायचे.

'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट

एअर इंडियात नोकरी सुरू करण्यापूर्वी रोशनीने स्पाइस जेट मध्ये दोन वर्षे काम केले होते. अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ती गावी आली होती. तिने आजी आजोबा, काका काकी यांची भेट घेतली, कुलदैवताचे दर्शन घेतले. घरी परतल्यानंतर लगेच तिला ही लंडनची फ्लाईट मिळाली. एक आठवड्यापूर्वीच माझे तिच्याशी  बोलणे झाले होते. तिच्या निधनाबद्दल आईला काहीच सांगितलेले नाही. तिचा मोठा भाऊ,वाहिनी आणि वडील अहमदाबादला गेले आहेत. आम्हाला अद्याप एअर इंडिया कडून अधिकृतरित्या फोन आलेला नाही, मात्र एअर इंडियाचे काही सहकारी अहमदाबादला कुटुंबासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया रोशनीच्या मामाने दिली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातdombivaliडोंबिवली