कल्याण डोंबिवलीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरूद्ध कारवाई; ९ लाखांची रेती, साधन सामग्री उद्ध्वस्त

By मुरलीधर भवार | Updated: February 18, 2026 16:33 IST2026-02-18T16:33:25+5:302026-02-18T16:33:59+5:30

पाच तास सुरु होती धडक कारवाई

Action taken against illegal sand mining in Kalyan Dombivali Sand worth 9 lakhs, equipment destroyed | कल्याण डोंबिवलीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरूद्ध कारवाई; ९ लाखांची रेती, साधन सामग्री उद्ध्वस्त

कल्याण डोंबिवलीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरूद्ध कारवाई; ९ लाखांची रेती, साधन सामग्री उद्ध्वस्त

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण आणि डोंबिवली मोठा गाव ठाकूर्ली रेती बंदर परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तब्बल पाच तास सुरु होती. या कारवाईत रेती उपसाकरणाऱ्यांची साधनसामग्री नष्ट करण्यात आली असून ९ लाखाचे नुकसान करण्यात आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याणचे प्रांत विश्वास गुजर आणि तहसीलदार विकास गारुडकर यांच्यासह नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण आणि पंजाबराव पवार यांच्या महसूल पथकाने ही कारवाई केली आहे. कल्याण रेती बंदर येथील रेतीचे चार हौद जेसीबी, पोकलनने जमीन दोस्त करण्यात आले. डोंबिवली मोठा गाव ठाकुर्ली रेतीबंदरातील अवैद्य रेती साठवणुकीचे १८ हौद नष्ट करण्यात आले. त्याअवैध रेतीचा ४८ ब्रास साठा होता. आठ इंजिन हे जेसीबी व पोकलेनने नष्ट करण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या कारवाईत अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे रेती आणि साधानसामग्री मिळून ९ लाखाचे नुकसान करण्यात आले. रेती उपसा करणाऱ्यांच्या विरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बड्या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यां माफियांचे कंबरडे मोडले आहे. अवैध रेती उपसा करणाऱ्यांना या कारवाईमुळे चाप बसण्यास मदत होईल. सरकारकडून वैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्यांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळेल. सरकारी गौण खनिज स्वामित्व धन वाढीस मदत होईल असा विश्वास प्रांत अधिकारी गुजर आणि तहसीलदार गरुकडकर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title : कल्याण-डोंबिवली में अवैध रेत खनन पर कार्रवाई: ₹9 लाख का नुकसान

Web Summary : कल्याण-डोंबिवली में रेती बंदर क्षेत्र के पास अवैध रेत खनन पर अधिकारियों ने कार्रवाई की, जिसमें ₹9 लाख के उपकरण और रेत नष्ट कर दिए गए। यह कार्रवाई भंडारण क्षेत्रों और मशीनरी को लक्षित करके की गई, जिसके परिणामस्वरूप इसमें शामिल लोगों के खिलाफ पुलिस शिकायत दर्ज की गई। अधिकारियों को कानूनी रेत खनन निविदाओं में अधिक भागीदारी की उम्मीद है।

Web Title : Crackdown on Illegal Sand Mining in Kalyan-Dombivli: ₹9 Lakh Worth Destroyed

Web Summary : Authorities in Kalyan-Dombivli cracked down on illegal sand mining near the Reti Bunder area, destroying equipment and sand worth ₹9 lakh. The operation targeted storage areas and machinery, leading to a police complaint against those involved. Officials anticipate increased participation in legal sand mining tenders.