शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच; RTO ची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 15:40 IST

वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार

कल्याण -  डोंबिवली शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक हे कोणतेही नियम न पाळता मनमानी कारभार करताना दिसतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही दिवसेंदिवस वाढत असून रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यात यावा  अशी मागणी देखील जोर धरु लागली होती. शुक्रवारी उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.सोमवारी  पुन्हा  नियम न पाळणा-या रिक्षाचालकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे डोंबिवली वाहतूक शाखा  पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे.        सोमवारी मुख्यतः विनागणवेश, विना लायसन्स,विना बॅच व कोविड च्या अनुषंगाने मार्च 2020 पूर्वी पासींग/इतर कागदपत्रांची मुदत संपलेल्या  110 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आली असून एकूण 1 लाख  6 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच 80 रिक्षाचालकांवर कारवाई करत 1 लाख 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. तसेच 2 रिक्षाही जमा करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं डोंबिवली वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस