अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला पोलिसांकडून अटक
By प्रशांत माने | Updated: July 27, 2023 19:52 IST2023-07-27T19:52:29+5:302023-07-27T19:52:52+5:30
३१ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला पोलिसांकडून अटक
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली काशिनाथ पाटील या २९ वर्षीय तरूणाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती.
बुधवारी पिडीता घराबाहेर पडली असता त्याने तिला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी काशिनाथला अटक करून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ३१ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.