शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल

By मुरलीधर भवार | Updated: May 3, 2024 19:24 IST

याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.

कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्राप्त अर्जांची उद्या छाननी केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.

कल्याण लाेकसभा मतदार संघातून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. महायुतीतर्फे त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव सेनेचे रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. एमआयएमकडून अशफाक सिद्दीकी यांनी अर्ज भरला आहे.

वंचित बहुजन आघाडी तर्फे मोहम्मद शेख सुलेमानीठाकूर यांनी अर्ज दाखल केला आहे. काल वंचित तर्फे जमीन खान यांनी अर्ज दाखल केला होता. या पैकी ज्याने एबी अर्ज जोडला असले त्याची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत १९ जणांनी अर्ज दाखले केले. त्यामध्ये  राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचेअरुण निटूरे, अपनी प्रजाहित पार्टीकडून अरुण जाधव, अमन समाज पार्टीकडून सलीम शेख आणि प्रवीण गवळी बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे पूनम बैसाने, बसपाकडून प्रशांत इंगळे, भीमसेनेकडून श्रीधर साळवी, पीस पार्टीकडून हबीबूर खान, राष्ट्रीय मराठा पार्टीकडून हिंदुराव पाटील यांच्यासह ज्ञानेश्वर लोखंडे, अजय मोर्या, नफिस अन्सारी, जमीला शेख, काशीनाथ नारायणकर, अमरीश मोरजकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल अर्ज केला आहे. 

टॅग्स :kalyan-pcकल्याण