टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

By अनिकेत घमंडी | Updated: July 6, 2023 01:02 IST2023-07-06T01:01:33+5:302023-07-06T01:02:22+5:30

ही घटना बुधवारी रात्री ९: २० च्या सुमारास घडली. यामुळे मागील लोकल अर्ध्या तासाने विलंबाने धावल्याने हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसला. 

A Titwala slow-speed local scraped onto the platform at Mumbra station; Half an hour local delay | टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

डोंबिवली - मुंबई येथून टिटवाळ्याच्या दिशेने निघालेल्या लोकलचा एक भाग मुंब्रा स्थानकात आल्यानंतर फलाट क्रमांक १ ला घासला गेला. यामुळे लोकलचा खोळंबा झाला होता. ही घटना बुधवारी रात्री ९: २० च्या सुमारास घडली. यामुळे मागील लोकल अर्ध्या तासाने विलंबाने धावल्याने हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसला. 
 
या घटनेनंतर, काही लोकल ठाणे, मुलुंड मार्गावर थांबल्या होत्या. अखेर ९:४५ वाजण्याच्या सुमारास त्या लोकलची रेल्वेच्या तंत्रिक विभागाने दुरुस्ती, पाहणी करून पुढे काढली. त्यानंतर रुळांची पाहणी करून रात्री १० वाजेच्या सुमारास लोकलचा धीमा डाऊन मार्ग पुढे सुरू झाला आणि खोळंबलेल्या लोकल पुढे काढण्यात आल्या. मात्र तरीही मध्यरात्रीपर्यंत लोकलचे वेळापत्रक विलंबाने चालेल असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Web Title: A Titwala slow-speed local scraped onto the platform at Mumbra station; Half an hour local delay