उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा गजाआड, मुद्देमाल जप्त

By प्रशांत माने | Updated: February 21, 2024 18:59 IST2024-02-21T18:57:10+5:302024-02-21T18:59:23+5:30

उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरी करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

A thief who steals through an open door Confiscation of goods | उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा गजाआड, मुद्देमाल जप्त

उघड्या दरवाजावाटे चोरी करणारा गजाआड, मुद्देमाल जप्त

डोंबिवली: उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरी करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. समीर जगत सोनार (वय २०) रा. समतानगर झोपडपट्टी, आयरेगांव डोंबिवली पुर्व असे अटक आरोपीचे नाव आहे. समीरने तो राहत असलेल्या भागात राहणाऱ्या अशोककुमार चव्हाण या भाजीपाला विक्रेत्याच्या घराच्या उघडया दरवाजावाटे आत घुसून रोकड आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती.

दरम्यान रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या तीन तासाच्या आत संबंधित गुन्हा उघडकीस आणत आरोपी समीरला बेडया ठोकल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितिन गिते यांनी दिली. ही कारवाई गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सुनील भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड आदींनी केली.

Web Title: A thief who steals through an open door Confiscation of goods