रिक्षा थांब्यावर नंबर लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

By प्रशांत माने | Updated: August 2, 2024 23:25 IST2024-08-02T23:24:57+5:302024-08-02T23:25:11+5:30

टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

A rickshaw puller was killed due to a dispute over numbering at a rickshaw stand | रिक्षा थांब्यावर नंबर लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

रिक्षा थांब्यावर नंबर लावण्याच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

प्रशांत माने/डोंबिवली लोकमत न्यूज नेटवर्क : येथील पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रिक्षा थांब्यावर रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुस-या रिक्षा चालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

खंबाळपाडा येथे कमानी जवळ रिक्षा थांबा आहे. याठिकाणी रिक्षाचा नंबर लावण्यावरून सुनील राठोड आणि अश्वीन कांबळे या दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. यात सुनील ने अश्विनवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात अश्विनचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीसांनी सुनील याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: A rickshaw puller was killed due to a dispute over numbering at a rickshaw stand