अंबरनाथमध्ये इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; सुदैवाने कोणालाही इजा नाही!
By पंकज पाटील | Updated: February 29, 2024 23:59 IST2024-02-29T23:59:17+5:302024-02-29T23:59:29+5:30
आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली

अंबरनाथमध्ये इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; सुदैवाने कोणालाही इजा नाही!
पंकज पाटील/ अंबरनाथ: शहराच्या राहुल नगर परिसरात पहिल्या मजल्यावर एका फ्लॅटला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला आहे. आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील राहुल नगर संकुलात एका फ्लॅटला अचानक आग लागली. क्षणार्धात ही आग वाढल्याने संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला आहे. तर त्याच्या शेजारी असलेल्या फ्लॅटला देखील धोका निर्माण झाला होता. अग्निशमक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र पाणी कमी पडल्याने आग विझवताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीमुळे कोणालाही इजा झाली नाही.