डोंबिवलीत धावत्या जीपने अचानक घेतला पेट, आगीत मोठे नुकसान

By प्रशांत माने | Updated: December 21, 2023 18:51 IST2023-12-21T18:51:04+5:302023-12-21T18:51:16+5:30

अचानक बॅटरीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.

A jeep running in Dombivli suddenly caught fire, causing huge damage in the fire | डोंबिवलीत धावत्या जीपने अचानक घेतला पेट, आगीत मोठे नुकसान

डोंबिवलीत धावत्या जीपने अचानक घेतला पेट, आगीत मोठे नुकसान

डोंबिवलीत : येथील सोनारपाडा परिसरातून कल्याणकडे जाणा-या जीपने अचानक पेट घेतल्याची घटना विको नाका येथे आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. ही गाडी विको नाका येथे आली असता चालक ब्रिजेश सिंग याला गाडीच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे निदर्शनास पडले. त्याने लागलीच चालती गाडी बाजुला घेतली आणि गाडी बंद करून बोनेट उघडले. 

आतील इंजिनच्या ठिकाणी असलेल्या बॅटरीतून धूर येत होता. पण अचानक बॅटरीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. काही सेकंदातच आगीच्या ज्वाळांनी गाडीला वेढले गेल्याचे पाहताच याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नसलीतरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
 

Web Title: A jeep running in Dombivli suddenly caught fire, causing huge damage in the fire