भंगाराच्या गोदामाला भीषण आग; दीड तासात आगीवर नियंत्रण

By प्रशांत माने | Updated: January 29, 2024 16:59 IST2024-01-29T16:58:58+5:302024-01-29T16:59:47+5:30

पुठ्ठयांच्या गठ्ठयांमुळे आग मोठया प्रमाणात भडकली आणि पसरली होती.

A huge fire broke out at a scrap warehouse the fire was brought under control in one and a half hours | भंगाराच्या गोदामाला भीषण आग; दीड तासात आगीवर नियंत्रण

भंगाराच्या गोदामाला भीषण आग; दीड तासात आगीवर नियंत्रण

प्रशांत माने,डोंबिवली: कल्याण-शीळ मार्गावरील दावडी गाव परिसरातील टेकडीलगत असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. गोदामाच्या ठिकाणी लोखंड, काच सामानांसह पुठ्ठयांचा मोठा प्रमाणात साठा होता. पुठ्ठयांच्या गठ्ठयांमुळे आग मोठया प्रमाणात भडकली आणि पसरली होती. आगीमुळे निर्माण झालेले धूराचे लोट दूरच्या ठिकाणाहून देखील दिसत होते.

अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झालेल्या चार बंब गाडयांनी पाण्याचा मारा करून दिड तासात आगीवर नियंत्रण मिळविले. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती डोंबिवली अग्निशमन विभागाचे केंद्रप्रमुख विनायक लोखंडे यांनी दिली. दरम्यान भंगार गोदामाला लागलेल्या आगीने ग्रामीण भागातील भंगार गोदामांचा आणि तिथल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: A huge fire broke out at a scrap warehouse the fire was brought under control in one and a half hours