इमारतीमधील बंद घराला आग; कुटुंब बाहेर असल्याने जिवीतहानी टळली
By मुरलीधर भवार | Updated: October 18, 2023 15:28 IST2023-10-18T15:28:17+5:302023-10-18T15:28:55+5:30
ज्या घराला आग लागली होती. त्या घरातील कुटुंब बाहेर गेले असल्याने जिवित हानी टळली आहे

इमारतीमधील बंद घराला आग; कुटुंब बाहेर असल्याने जिवीतहानी टळली
कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील खडकापाडा परिसरातील साई पॅराडाईज इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील बंद घराला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे पाचव्या मजल्यावरुन मोठा धूर येत होता. त्यामुळे इमारतीमधील रहिवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थल तातडीने घाव घेतली.
ज्या घराला आग लागली होती. त्या घरातील कुटुंब बाहेर गेले असल्याने जिवीतहानी टळली आहे. घरातील विजेच्या उपकरणांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. घरातील फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.