लग्नाचे आमिष दाखवून माजी नगरसेवकाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: February 1, 2024 16:07 IST2024-02-01T16:06:44+5:302024-02-01T16:07:04+5:30

बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजपा माजी नगरसेवक मनोज राय याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

A case of torture has been filed against the former corporator by luring her into marriage | लग्नाचे आमिष दाखवून माजी नगरसेवकाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून माजी नगरसेवकाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुरलीधर भवार,कल्याण: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजप माजी नगरसेवक मनोज राय याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत राहते घरी शारीरीक संबंध ठेवले. ती चार वेळा गरोदर राहिली.

चारही वेळा तिचा गर्भपात केला. तिने लग्न करण्यासाठी त्याचाकडे तगादा लावला असता तिला मारझोड केली. मारझोड करुन लग्न करण्यास नकार दिला. याची वाच्यता कुठेही करु नये यासाठी धमकी दिली. पिडीत महिले या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राय याच्या विरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राय याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याने प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: A case of torture has been filed against the former corporator by luring her into marriage