राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:28 IST2023-03-03T09:28:13+5:302023-03-03T09:28:28+5:30

इशारा देताना पटेल यांनी शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे पटेल यांच्यावर गुन्हा दाखल होणार, असे संकेत मिळत आहेत.

A case is likely to be registered against Rajul Patel | राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता

राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता

लाेकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याणमध्ये आयोजित उद्धव ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसेनेच्या मुंबईच्या महिला संघटक राजूल पटेल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. पटेल यांनी अलीकडेच ठाण्यात केलेल्या अशाच शिवराळ भाषणाकरिता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरे गटाच्या मेळाव्यास भिवंडी लाेकसभेचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. महाजन हाॅलमध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी राजूल पटेल म्हणाल्या की, ठाकरेंच्या शिवसेनेची ही लढाई निष्ठा विरुद्ध स्वार्थाची लढाई आहे. या लढाईत स्वार्थी माणूस हरणार आणि निष्ठा जिंकणार आहे. अडीच वर्षांनंतर  शिवसेना जे करतेय ते चुकीचे आहे, याची आठवण झाली का? आमच्याजवळ बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. त्यांना जागा  दाखवून देणे गरजेचे आहे, असा इशारा देताना पटेल यांनी शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे पटेल यांच्यावर गुन्हा दाखल होणार, असे संकेत मिळत आहेत.

Web Title: A case is likely to be registered against Rajul Patel