शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

डोंबिवलीतील 49 रिक्षा थांबे बंद करण्याचा आदेश धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:07 IST

मार्च २०१७ चा अहवाल : केडीएमसी, आरटीओ, पोलिसांचे सर्वेक्षण

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवलीसह महापालिका क्षेत्रातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याचे स्वागत होत असले तरीही महापालिका, आरटीओ, ट्रॅफीक पोलीस या तिन्ही यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून तीन वर्षांपूर्वी १८ मार्च २०१७ रोजी डोंबिवली शहरातील सुमारे ११३ पैकी ४९ रिक्षा थांबे हे वाहतुकीला बाधा आणत असून ते तातडीने बंद करावेत, असे संयुक्त अहवालात नमूद केले होते. परंतु, नेहमीप्रमाणेच हा अहवालदेखील धूळखात पडल्याने शहरांतर्गत कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.रेल्वे स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम दिशांना तर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण मिळवणे हे वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेले आहे. रामनगर भागात पूर्वेकडील विविध भागातून येणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतूक पोलिसांच्या दालनासमोरच दिवस-रात्र कोंडी झालेली दिसून येते. त्या अहवालात पूर्वेला १८ आणि पश्चिमेला असलेले रिक्षाचे ३१ थांबे तातडीने बंद करावेत, असे म्हटले होते.त्यामध्ये चिमणी गल्ली, मदन ठाकरे थांबा, सरोवर बार गोग्रासवाडी, पाथरली गावठाण, मंजुनाथ स्कूल, जानकी हॉटेलनजीक, सावरकर पथ महादेव मंदिरजवळ, केळकर पथ वृंदावन हॉटेलजवळ, विवेकानंद सोसायटीसमोर, गावदेवी मंदिर चौक, शिव मंदिर चौक, स्नेहंकीत मित्रमंडळ चौक, कृष्णसुदामा थांबा, डीएनसी शाळेजवळ हुमाननगर थांबा, ओम बंगला आयरे पथ, स्वामी नारायण मंदिर, साईबाबा मंदिर आयरे पथ, राजगंगा थांबा आदींचा समावेश होता. पश्चिमेला अपूर्व हॉस्पिटल नजीक, म्हाळसाई रिक्षा थांबा, सखाराम थांबा, तुळशीराम जोशींच्या बंगल्याजवळ, श्रीराम मंदिर नं ३, नेमाडी गल्ली थांबा नं १, गिरिजामाता मंदिराजवळ, फुलेनगर रिक्षा थांबा, गावदेवी मंदिरा लागूनचा थांबा, गोपीनाथ चौकाच्या नाल्याजवळील, अनमोल नगरी, श्रीधर म्हात्रे चौक, गरिबाचा वाडा, नील कमळ बंगल्याजवळ, स्वामी शाळेसमोर फुले पथ, भरत भोईरनगर रिक्षा थांबा, महाराष्ट्रनगर अभिनंदन सोसायटीसमोर, योग संकुलासमोर, विजय सोसायटीनजीक, नवापाडा, करण बिल्डिंगजवळ, शंखेश्वर पाडा,  जोंधळे मंदिराजवळ, महात्मा गांधी उद्याननजीक, जयहिंद कॉलनी गुप्ते पथ, रोकडे बिल्डिंग जवळ, ट्रान्झिट कॅम्पसमोर,  त्रिभुवन सोसायटीसमोर, राजश्री बंगला, सम्राट चौक, लक्ष्मी डेअरी, फ्लेक्स जिमजवळ आदी रिक्षाथांब्यांचा समावेश आहे.

nपरिसरातील जागा अरुंद, रस्ते छोटे असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने बहुतांश थांबे बंद करावेत, अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नव्हती. आयुक्तांनी आवश्यक ते बदल करून वाहतुकीला शिस्त आणावी, अशी मागणी वाहतूककोंडीने त्रस्त प्रवासी करत आहेत.nशहरात ११३ थांबे असल्याची नोंद असून, त्यावेळच्या अंदाजानुसार पूर्वेला ३४ आणि पश्चिमेला २९ स्टॅण्ड असण्याची गरज होती, असेही नमूद केले होते. सध्या तर गल्लोगल्ली रिक्षा थांबे झाल्याचे निदर्शनास येत असून, हा आकडा ११३ हून अधिक असण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे.