सॉफ्टवेअर इंजिनीअरची ४० लाखांची फसवणूक; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 07:26 AM2024-06-24T07:26:38+5:302024-06-24T07:26:56+5:30

प्रतीक सिंग (वय २५) पंधरा दिवसांपूर्वी घरी असताना त्याच्या मोबाईलवर प्रिया आणि अविका यांचा फोन आला.

40 lakh fraud of software engineer A case has been registered against two women | सॉफ्टवेअर इंजिनीअरची ४० लाखांची फसवणूक; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

सॉफ्टवेअर इंजिनीअरची ४० लाखांची फसवणूक; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: ऑनलाइन नोकरीचे प्रलोभन दाखवत सॉफ्टवेअर इंजिनीअरला दोन महिलांनी ४० लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रिया व अविका मिश्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक सिंग (वय २५) पंधरा दिवसांपूर्वी घरी असताना त्याच्या मोबाईलवर प्रिया आणि अविका यांचा फोन आला. ऑनलाइनच्या माध्यमातून अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन त्यांनी प्रतीकला दाखवले. घरबसल्या अर्धवेळ नोकरी मिळते, म्हणून प्रतीकने त्या महिलांना प्रतिसाद दिला. त्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून एक लिंक पाठवली. या लिंकच्या माध्यमातून प्रतीकला टप्प्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. 

अधिकचा नफा मिळेल, असे आश्वासन त्यांनी प्रतीकला देऊन बैंक खात्यातील ४० लाख ४० हजार तीनशे रुपये दोघींनी स्वतःच्या खात्यांत वळवून घेतले. गुंतवणुकीवर तातडीने नफा मिळत असल्याने प्रतीक त्या नफ्याची मागणी दोघींकडे करू लागला. परंतु, त्या महिलांनी प्रतीकच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे प्रतीकच्या लक्षात आले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस तपास करत आहेत.

Web Title: 40 lakh fraud of software engineer A case has been registered against two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.