जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत २८८ खेळाडूंचा सहभाग

By अनिकेत घमंडी | Updated: October 14, 2023 17:18 IST2023-10-14T17:18:21+5:302023-10-14T17:18:56+5:30

कल्याणला बिर्ला महाविद्यालयात भरल्या स्पर्धा 

288 players participated in district level football tournament | जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत २८८ खेळाडूंचा सहभाग

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत २८८ खेळाडूंचा सहभाग

डोंबिवली: जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांचा शुभारंभ शनिवारी कल्याण पश्चिम येथील बिर्ला महाविद्यालयात संपन्न झाला. मुली वयोगट १७ वर्षे असे त्या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेमधे एकूण सहभागी शाळा १६ आणि प्रत्येकी १ शारीरिक शिक्षण शिक्षक व १ कोच यांचा सहभाग होता. खेळाडूंची उपस्थिती अतिशय उस्पूर्त प्रतिसाद मिळाला, एकूण २८८ खेळाडू तेथे आले होते. खेळाच नियोजन खूप चांगल्याप्रकारे करण्यात आल्याची प्रतिक्रिया विपुल गायकवाड यांनी दिली. त्यासाठी बिर्ला स्कुलचे शिक्षक स्पर्धा प्रमुख लक्ष्मण बाबू भांडे, लिना प्रशांत कांबळे, दीपक खरात यांनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळाचं आयोजन व नियोजन केल्याचे गायकवाड म्हणाले.

तसेच सर्व सहभागी शाळांच्या शारीरिक शिक्षक व त्यांचे कोचेस यांनी अतिशय परिश्रम घेऊन स्पर्धा पार पाडली. स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी पंचाच ही चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाल्याचे सांगण्यात आले, या स्पर्धेतील विजयी संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्पर्धा विभाग (स्पोर्ट्स) यांचे चांगल्याप्रकारे सहकार्य मिळाल्याचे आयोजकांनी संगितले. 

Web Title: 288 players participated in district level football tournament