मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 16:30 IST2021-07-31T16:29:43+5:302021-07-31T16:30:28+5:30
कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे.

मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे. मात्र काही नागरिक अजूनही लस घेण्याबाबत संभ्रमामध्ये असल्याचे दिसून येते. कोरोनाशी लढा देण्यासाठी अपंग बांधवही पूढे येऊन लस घेत आहे. डोंबिवलीमधील 103 वर्षांच्या आजीबाईंनी सुद्धा कोविड लस घेतली आहे.
कोवीडची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोवीड लस घेतली. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली आहे.त्यामुळे अद्यापही कोवीड लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्या लोकांसाठी या 103 वर्षांच्या अजीबाईंनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे.