प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 16:48 IST2018-07-30T16:47:06+5:302018-07-30T16:48:41+5:30
प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असणार आहे. प्रो-कबड्डीचा हा हंगामही तीन महिन्यांचा असणार आहे.

प्रो-कबड्डी लीगला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात
मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असणार आहे. प्रो-कबड्डीचा हा हंगामही तीन महिन्यांचा असणार आहे.
प्रो-कबड्डीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा 19 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व अजय ठाकूरकडेच सोपवण्यात आले आहे. अजयच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत खेळला होता.
प्रो-कबड्डी लीगला 2014 साली सुरुवात झाली होती. प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाने बाजी मारली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामात यु मुंबा या संघाने जेतेपद पटकावले होते. पटणा पायरेट्स या संघाने आतापर्यंत तीनदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.