Pro Kabaddi League 2018: यूपी योद्धाची सरशी, तमिळ थलायव्हाजला चकवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:33 IST2018-10-08T22:31:31+5:302018-10-08T22:33:35+5:30
अजय ठाकूर व मनजीत छिल्लर अपयशी

Pro Kabaddi League 2018: यूपी योद्धाची सरशी, तमिळ थलायव्हाजला चकवले
चेन्नई : प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या पाटणा पायरेट्सला धुळ चारणाऱ्या तमिळ थलायव्हाजला सोमवारी पराभव पत्करावा लागला. यूपी योद्धा संघाने त्यांच्यावर 37-32 अशी मात केली. अजय ठाकूर व मनजीत छिल्लर या दिग्गजांचा खेळ प्रभाव पाडू शकला नाही.
यूपी योद्धा संघाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सत्रातच १८-४ अशी आघाडी घेतली. प्रशांत कुमार राय, श्रीकांत जाधव आणि सागर क्रिष्णा यांनी तमिळ थलायव्हाजचा बजाव कुचकामी केला. पहिल्या सत्रात यूपीने दोन लोण चढवले. चढाईपेक्षा यूपीच्या बचावपटूनी सुरेख कामगिरी बजावली.
Yoddhas are on 🔥 tonight, leading the home team 18-4 at half-time!
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
Will the second half go the other way? #CHEvUP
मध्यंतरानंतर यूपीने आघाडी कायम राखण्यावर भर दिला. अजय ठाकूर व मनजीत छिल्लर हे दिग्गज असूनही तमिळ थलायव्हाज संघाला ही पिछाडी भरून काढता आली नाही. यूपीने आघाडी वाढवण्यापेक्षा ती कायम राखण्यावर भर देत बचावात चतुर खेळ केला.