शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

Pro Kabaddi League 2018 : यू मुंबाचा जबरदस्त पलटवार, जयपूर पिंक पँथर्सची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 7:58 PM

Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या लढतीत पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले होते. पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली.

चेन्नई : अखेरच्या पाच मिनिटांत यू मुंबाने जबरदस्त खेळ केला. सिद्धार्थ देसाईच्या एकहाती खेळाच्या जोरावर यू मुंबाने अखेरच्या दोन मिनिटांत 38-30 अशी आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला. यू मुंबाने हा सामना 39-32 असा जिंकला

 

पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली. पुन्हा एकदा सिद्धार्थ देसाईने परफेक्ट 10 गुण कमावत संघाची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू ठेवली आहे.

 

यू मुंबाने मध्यंतरानंतर दमदार पुनरागमन करताना पिछाडीवरून 26-25 अशी आघाडी घेतली. मात्र जयपूरने कमबॅक केले. अखेरच्या पाच मिनिटापर्यंत जयपूरकडे 30-26 अशी आघाडी होती.

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स संघाने नाणेफेक जिंकून यू मुंबाला त्यांनी प्रथम चढाईचे आमंत्रण दिले आहे. जयपूरने पहिल्या सत्रात 15-10 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर यू मुंबाचा खेळ बहरला. नितीन रावलने एका चढाईत दोन गुण घेताना जयपूरला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी अभिषेक बच्चनचे कुटुंबही आले होते.

 

जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या दहा मिनिटांत यू मुंबाला ऑल आऊट केले आणि मजबूत आघाडी घेतली. संदीप धुलने या आघाडीत मोठी भूमिका बजावली. जयपूरने पहिल्या सत्रात 15-13 अशी आघाडी घेतली आहे.

 

जयपूर पिंक पँथर्सने पहिल्या पाच मिनिटांत 5-2 अशी आघाडी घेतली आहे. त्यात भर घालताना जयपूरने पहिल्या दहा मिनिटांत 11-5 अशी आघाडी घेतली.

 

जयपूर पिंक पँथर्सकडून सहा खेळाडू आज पदार्पण करणार आहेत.

 

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात सामना होणार आहे. यू मुंबाचा माजी कर्णधार अनुप कुमार यंदा जयपूरकडून खेळत आहे. त्यामुळे हा सामना अनुप कुमार विरुद्ध यू मुंबा असा होण्याची शक्यता अधिक आहे.

(Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार)

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी