Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:43 PM2018-10-10T17:43:54+5:302018-10-10T17:44:23+5:30

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत.

Pro Kabaddi League 2018: Anup Kumar will play against U Mumba for the first time in five years | Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार 

Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार 

googlenewsNext

चेन्नई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत. यापैकी यू मुंबा आणि जयपूर यांच्यातील सामन्याची अधिक उत्सुकता आहे. त्याल कारणच तसे आहे. यू मुंबाचा माजी कर्णधार अनुप कुमार यंदा जयपूरकडून खेळत आहे. त्यामुळे हा सामना अनुप कुमार विरुद्ध यू मुंबा असा होण्याची शक्यता अधिक आहे.



प्रो कबड्डीतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून अनुप कुमार याची ओळख आहे. त्याने मागील पाच पर्वात यू मुंबाचे नेतृत्व सांभाळले होते, परंतु यंदा यू मुंबाने त्याला संघाबाहेर केले. जयपूर पिंक पँथर्सने त्याला संघात घेत कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. 


या सामन्यात अनुपला एक विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात चढाईत 11 गुणांची कमाई केल्यानंतर अनुपच्या खात्यातील गुणसंख्या एकूण 500 होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरू शकतो. या क्रमवारीत तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ( 675) आघाडीवर आहे. त्यानंतर पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल ( 636), तमिळ थलायव्हाजचा अजय ठाकूर ( 563), जयपूर पिंक पँथर्सचा दीपक निवास हुडा ( 514) यांचा क्रमांक येतो. 


 

Web Title: Pro Kabaddi League 2018: Anup Kumar will play against U Mumba for the first time in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.