Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीची पाचव्या पर्वातील 'हे' विक्रम तुम्हाला माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 17:49 IST2018-10-07T17:46:08+5:302018-10-07T17:49:34+5:30
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे.

Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीची पाचव्या पर्वातील 'हे' विक्रम तुम्हाला माहित आहेत का?
मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल. पण, सहाव्या पर्वाला सामोरे जाण्यापूर्वी मागील पर्वात झालेले विक्रम तुम्हाला माहित आहेत का ?
- प्रो कबड्डी लीगमध्या पाटणा पायरेट्स हा सर्वात यसश्वी संघ आहे. प्रत्येक पर्वात प्ले ऑफमध्ये मजल मारणारा तो एकमेव संघ आहे. त्यांनी सर्वाधिक तीनवेळा ( 2016, 2016 व 2017) जेतेपद जिंकली आहेत.
- तेलगु टायटन्सचा राहुल चौधरी हा लीगमधील सर्वात यशस्वी रेडर आहे. त्याने 79 सामन्यांत एकूण 710 गुणांची कमाई केली असून त्यातील 666 गुण हे चढाईत कमवले आहेत.
- पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने मागील पर्वात चढाईत 300 गुण पटकावले होते. एका हंगामात सर्वाधिक गुण कमावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने चढाईत एकूण 369 गुण कमावले आहेत.
- तामिळ थलायवाजचा मनजीत चिल्लर हा सर्वात यशस्वी बचावपटू आहे. त्याने 74 सामन्यांत 243 पकडी केल्या आहेत.
- राहुल चौधरीने सर्वाधिक सुपर 10 (32 वेळा) गुण कमावले आहेत, तर प्रदीप नरवालने सर्वाधिक 32 सुपर रेड केल्या आहेत.