Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत रंगले यूपी आणि पटणातील युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 21:06 IST2018-10-11T21:05:58+5:302018-10-11T21:06:54+5:30
अखेरची चढाई करायला दमदार फॉर्मात असलेला युपी संघाचा श्रीकांत जाधव आला होता. त्याने जर दोन गुण मिळवले असते तर युपीने हा सामना जिंकला असता.

Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत रंगले यूपी आणि पटणातील युद्ध
चेन्नई : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या प्रो-कबड्डी लीगच्या युद्धात अखेर पटणा पायरेट्सने यूपी योद्धा संघावर दोन गुणांनी विजय मिळवला. अखेरची चढाई शिल्लक असताना पटणाचा संघ फक्त एक गुणांनी आघाडीवर होता. पण अखेरची चढाई करायला दमदार फॉर्मात असलेला यूपी संघाचा श्रीकांत जाधव आला होता. त्याने जर दोन गुण मिळवले असते तर यूपीने हा सामना जिंकला असता. पण श्रीकांतची पकड करत पटणाने यूपीवर ४३-४१ असा विजय मिळवला.
😰 - that face when you witness a 40-minute #VivoProKabaddi thriller!@PatnaPirates end up winning the pulsating encounter, defeating @UpYoddha 43-41! #UPvPAT
— ProKabaddi (@ProKabaddi) October 11, 2018
यूपी आणि पटणा या संघांतील सामन्यातील दोन्ही सत्र चांगलीच रंगतदार ठरली. पहिल्या सत्रात पटणाने यूपीवर फक्त एका गुणाने नाममात्र आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी तोडीस तोड केला.
Kisi ke haath na aaye yeh ladka! 💪#UPvPAT#PirateHamlapic.twitter.com/xSZJ4o73yI
— Patna Pirates (@PatnaPirates) October 11, 2018
यूपीपी योद्धा आणि पटणा पारेट्स यांच्यातील पहिले सत्र चांगलेच चुरशीचे झाले. यूपीच्या संघाने सुरुवातीला चांगलीच आघाडी घेतली होती. पण काही वेळात यूपीचा कर्णधार रिशांक बाद झाला. त्यानंतर पटणाने जोरदार आक्रमण लगावले आणि यूपीच्या संघावर पहिला लोण चढवत आघाडी घेतली. पहिला लोण चढल्यावर युपीचा संघ आक्रमक झाला आणि त्यांनी सामन्यात झोकात पुनरागमन केले. पहिले सत्र संपायला एक मिनिट शिल्लक असताना दोन्ही संघांची २०-२० अशी बरोबरी होती, पण अखेरच्या मिनिटात पटणाने एक गुण मिळवला. त्यामुळे मध्यंतराच्यावेळी पटणाकडे २१-२० अशी एक गुणांची नाममात्र आघाडी होती.
Half-time! @UpYoddha hold the edge over @PatnaPirates, and lead the Panga 21-20. Will the tables turn in #UPvPAT? Keep watching #VivoProKabaddi on Star Sports 2/2HD/1 Hindi/1HD Hindi/1 Tamil.
— ProKabaddi (@ProKabaddi) October 11, 2018