PKL 2019: Bengaluru Bulls Beat U Mumba In Pro Kabaddi Leauge | PKL 2019: बंगळुरु बुल्सची यू मुंबावर धडक 
PKL 2019: बंगळुरु बुल्सची यू मुंबावर धडक 

मुंबई: प्रो कबड्डी लीग 2019 स्पर्धेत रविवारी यू मुंबा विरुद्ध बंगळुरु बुल्समध्ये सामना रंगला होता. या रोमांचक सामन्यात बंगळुरु बुल्सने यू मुंबाला 30- 26 अशा फरकाने पराभूत केले.

वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात बंगळुरु मध्यंतराला 13- 11 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पवन कुमारच्या 11 चढाई पॅाईंट्सच्या जोरावर बंगळुरु बुल्सला विजय मिळविला. तसेच या विजयासह बंगळुरु बुल्सने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

या सामन्याच्याआधी दबंग दिल्ली विरुद्ध हरयाणा स्टीलर्सचा सामना झाला होता. या सामन्यात दबंग दिल्लीने हरयाणा स्टीलर्सचा 41- 21 अशा फरकाने विजय मिळविला. 

दिल्लीने चंद्रन रंजित 11 पॅाईंट्स आणि नवीन कुमार 10 पॅाईंट्स यांच्या बळावर दिल्लीने विजयाची रथ कायम ठेवली. 

English summary :
The Pro Kabaddi League (PKL)2019 match was played in between U Mumba and Bengaluru Bulls on Sunday. In this exciting match, Bengaluru Bulls defeated U Mumba by a margin of 30- 26. Match held at National Sports Club of India (NSCI), Worli.


Web Title: PKL 2019: Bengaluru Bulls Beat U Mumba In Pro Kabaddi Leauge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.