शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:42 AM

महाराष्ट्राने केरळचा ५४-३८ असा पराभव करीत आगेकूच केली

रोहा : रोहा येथे सुरू असलेल्या ६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी थरार बघायला मिळाला. येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८ असा पराभव करीत आगेकूच केली. रिषांक देवाडिका व तुषार पाटील यांनी सुंदर खेळ केला.रिषांकने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण करीत महाराष्ट्राच्या गुणांचे खाते खोलले. ८व्या मिनिटाला तुषार पाटीलने शिलकी ४ गडी एकाच चढाईत टिपत केरळवर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. पुन्हा जोरदार आक्रमण करीत दुसरा लोण देत आणला होता, पण केरळच्या शिलकी एक खेळाडूने बोनससह दोन गडी टिपत व नीलेश साळुंखेची अव्वल पकड करीत होणारा लोण केरळने लांबविला. मध्यंतराला २४-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यंतरानंतर तिसºया मिनिटाला दुसरा लोण देत महाराष्ट्राने २९-१३ अशी आघाडी घेतली. तिसरा लोण देताना पुन्हा एकदा तुषारने ६व्या मिनिटाला ४ गडी टिपले तर शिलकी दोन गडी रिषांकने टिपत ७ व्या मिनिटाला लोण देत ४२-१८ अशी आघाडी वाढविली. यानंतर तुषारला विश्रांती देण्यात आली. पण मध्यंतरानंतर ११ व्या मिनिटाला एका लोणची परतफेड करीत केरळने ३०-४५ अशी आघाडी कमी केली.पुन्हा एकदा महाराष्ट्राने जोरदार कमबॅक करीत १६ गुणांनी सामना खिशात टाकला. महाराष्ट्राकडून तुषार पाटीलने ७ चढाया करीत १० गुण मिळविले. अजिंक्य पवारने ८ चढायात ८ गुण घेतले. रिषांकने देखील चढायात गुण घेतले. विशाल माने व विकास काळे यांनी ४-४ पकडी घेत आपली भूमिका पार पाडली. केरळकडून जिष्णू के.के. यांनी ८ चढायात २ बोनस व ६ गडी टिपले. सागर कृष्णाने ४ पकडी करीत चांगला प्रतिकार केला.दुसºया सामन्यात बिहारने राजस्थानचा प्रतिकार ४५-४४ असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यंतराला २३-१९ अशी आघाडी बिहारकडे होती. बिहारकडून नवीनने ३४ चढाया करताना ३ बोनससह १९ गुण मिळवीत या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून सचिनने १७ चढायात ३ बोनस व १२ गुण घेत चांगला प्रतिकार केला. इतर सामन्यात कर्नाटकने पाँडेचेरीला ६४-२२ असे, तर भारतीय रेल्वेने दिल्लीला ५६-३१ असे नमवित आगेकूच केली.