शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, नागपूर, एसएनडीटी भारती विद्यापीठ कबड्डी संघांची प्रत्येकी दोन गुणांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:30 IST

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांचे सामने निर्णायक अवस्थेत

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठ विरूद्ध नागपूर विद्यापीठ यांच्यात सोमवारी सकाळी लढत भारती विद्यापीठ विरूद्ध एस.एन.डी.टी. विद्यापीठ यांच्यात सामने होतील.हे संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व करतील.

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, मुंबई, एस.एन.डी.टी. मुंबई, आर.एस.टी.एम. विद्यापीठ, नागपूर व भारती विद्यापीठ, पुणे विद्यापीठाने रविवारी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली आहे. 

रविवारी पहिल्या साखळी सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाने भारती विद्यापीठ, पुणे संघाचा ४२-२१ असा २१ गुणांनी दारूण पराभव केला. प्रारंभापासून मुंबई संघाने आक्रमक धोरण स्वीकारत पुणे संघाला नामोहरण केले. मुंबई विद्यापीठातर्फे मेघा कदम आणि प्रतीक्षा हिने दमदार चढाई करत संघाला बढत मिळवून दिली. भारती संघातर्फे पूनम तांबे आणि आदिती  जाधव यांचा प्रतिकार अपयशी ठरला. दुसºया सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ संघाने एस.एन.डी.टी., मुंबई संघाचा चुरशीच्या लढतीत ३५-२९ असा ६ गुणांनी पराभव केला. अंजली रावत हिने शानदार चढाई करत आपल्या संघासाठी गुणांची कमाई केली.

दुपारच्या सत्रात झालेल्या तिसऱ्या साखळी सामन्यात एस.एन.डी.टी.,मुंबई संघाने मुंबई विद्यापीठ, मुंबई संघाचा ३०-२६ असा ४ गुणांनी पराभव केला. दोन्ही मुंबई संघात झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. एस.एन.डी.टी.मुंबई तर्फे ऋतिका हनुमाने हिने उत्कृष्ट चढाई करत तर दीक्षा जोरे व प्रतीक्षा यांनी उत्कृष्ट पकडीच्या जोरावर मुंबई विद्यापीठ संघावर वर्चस्व गाजविले. चौथ्या साखळी सामन्यात भारती विद्यापीठ संघाने नागपूर विद्यापीठ संघाचा ३३-२९ असा ४ गुणांनी पराभव केला. हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यंतरांपर्यंत भारती विद्यापीठ, पुणे संघ २०-१८ असा २ गुणांनी आघाडीवर होता. पूनम तांबे आणि आदिती जाधव यांनी चपाळीने चढाई करत आपल्या संघाला गुणांची बढत मिळवून दिली. मानसी सावंत आणि काजल यांनी उत्कृष्ट पकड करीत संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. हे सर्व सामने आंतरराष्ट्रीय पंच व स्पर्धा निरीक्षक पदमाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आले. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीAmravatiअमरावती