District Level Kabaddi Tournament: Durgamata Sports Club and Siddhaprabh Foundation are in the final round | जिल्हास्तरीय कबड्डी  स्पर्धा : दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धप्रभा फौंडेशन अंतिम फेरीत
जिल्हास्तरीय कबड्डी  स्पर्धा : दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धप्रभा फौंडेशन अंतिम फेरीत

मुंबई : अमरहिंद मंडळ आयोजित कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धप्रभा फौंडेशनने  आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला

आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिद्धप्रभा फौंडेशनने जय दत्तगुरु मंडळ या संघाचा (१४-१७-१८-१२) ३२ विरुद्ध २९ असा अवघ्या तीन  गुणांनी पराभव केला. सिद्धप्रभा फौंडेशनने मध्यंतराला असलेली ३ गुणांची पिछाडी दुसऱ्या पाळीत उत्तम चढाई करीत भरून काढली व सामना तीन गुणांनी जिंकला. सिद्धप्रभा  कडून  खेळताना  ओंकार ढवळे  याने चढाईत ७ गुण  तर    पकडीत  ३ गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला तर  ओंमकार पवार याने  चढाईत ७ गुण  मिळवत त्याला सुंदर साथ दिली तर   जय दत्तगुरु मंडळ  तर्फे खेळताना सिद्धार्थ बोरकर   याने चढाईत १५ गुण तर  कौस्तुभ तिवरेकर  याने पकडीत २ गुण वसूल करत  त्याला चांगली साथ दिली.

आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब  यांनी विजय क्लब   या संघाचा (१७-०८-२०-०८) ३७ विरुद्ध १६ असा एकवीस  गुणांनी एकतर्फी पराभव केला. दुर्गामाता    कडून  खेळताना करण कदम याने चढाईत ०६ गुण मिळवले तर    पकडीत  ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला तर व प्रथमेश पलांडे याने चढाईत  १२ गुण मिळवले  तर  विजय कडून  खेळताना सुधीर सिंग याने चढाईत ५ गुण मिळवले तर शुभम पवार याने पकडीत २ गुण वसूल केले व चांगली लढत दिली.

Web Title: District Level Kabaddi Tournament: Durgamata Sports Club and Siddhaprabh Foundation are in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.