छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहर व ठाण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:48 PM2018-12-23T15:48:18+5:302018-12-23T15:49:04+5:30

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चषक  कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर व ठाण्याचे पुरुष व महिला दोन्ही संघ उपांत्य फेरीत. ...

Chhatrapati Shivaji Maharaj Trophy Kabaddi: Mumbai city and Thane both teams in semis | छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहर व ठाण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहर व ठाण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

googlenewsNext

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर व ठाण्याचे पुरुष व महिला दोन्ही संघ उपांत्य फेरीत. इतर संघात पुणे, रत्नागिरी महिलांत, तर मुंबई उपनगर, सांगली पुरुषांत उपांत्य फेरीत धडकले. विदर्भ राज्य कबड्डी असो.चे चारही पुरुष आणि महिला संघ साखळीतच गारद झाले. पुण्याचा पुरुष संघ देखील साखळीत गारद.

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. इस्लामपूर-सांगली येथे सुरू असलेल्या २० व्या वरिष्ठ गट आंतर-राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांचे व पुरुषाचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले.

महिला विभागात पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात कोल्हापूरने पुणेला चांगली झुंज दिली. मध्यंतरापर्यत १५-१० अशी आघाडी पुणे कडे होती. आम्रपली गलांडे व आदिती जाधव ने चांगले खेळ केला. पुणे हा सामना ३५-२५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

ठाणे विरुद्ध पालघर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणे ने ४१-१५ असा विजय मिळवला. मुंबई शहरने नाशिक वर ४९-१९ असा एकतर्फी विजय मिळवला. महिलांच्या मुंबई उपनगर विरुद्ध रत्नागिरी चौथ्या उपांत्यपूर्व सामना अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरा पर्यत १८-१२ अशी आघाडी रत्नागिरी कडे होती. श्रद्धा पवार ने केलेल्या आक्रमक चढाया मुळे रत्नागिरी आघाडी घेतली होती. शेवटचा मिनिट शिल्लक असताना उपनगर रत्नागिरी वर लोन टाकत सामन्यातील चुरस वाढवली. रत्नागिरी कडे १ गुणाची आघाडी असताना सामन्याची शेवटची रेड मध्ये उपनगरच्या कोमल देवकर ने बोनस केला पण तिची पकड झाली. रत्नागिरी ३४-३३ विजय मिळवला.

पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध नंदुरबार यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरा पर्यत १८-१८ असा बरोबरीत सामना होता. नंदुरबार कडून सूरज देसाई ने चांगला खेळ केला. मुंबई शहर च्या अजिंक्य कापरे ने केलेली सुपररेड ने सामनाला कलाटणी दिली. मुंबई शहर ने ४३-३२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत मिळवला. यजमान सांगली संघाने रत्नागिरी चा ३६-२० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. सांगलीच्या नितीन मदने एकाच चढाईत ७ खेळाडूंना बाद करत लोन मिळवून असे ९ गुणांची कमाई केली.

 

पुरुष विभागात रायगड विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात सुरुवातीला चुरशीची लढत मध्यंतरानंतर उपनगरने एकतर्फी विजय मिळवला. ४६-३० असा विजय मिळवत मुंबई उपनगरने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपनगरच्या विजयात नितीन देशमुख व अनुज यादव चमकले. ठाणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेला सामना ठाणे ने ४५-३८ असा जिंकला.

आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीचे सामने व अंतिम सामने होतील. महिला विभागात पुणे विरुद्ध मुंबई शहर व रत्नागिरी विरुद्ध ठाणे यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील. पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध सांगली व मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे असे सामने होतील.

 

महिला विभाग उपांत्य फेरी

१) पुणे विरुद्ध मुंबई शहर

२) ठाणे विरुद्ध रत्नागिरी

 

पुरुष विभाग उपांत्य फेरी

१) मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे

२) मुंबई शहर विरुद्ध सांगली

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Trophy Kabaddi: Mumbai city and Thane both teams in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी