Captain Cool gets sudden retirement from Kabaddi | 'कॅप्टन कूल'ने घेतली कबड्डीमधून अचानक निवृत्ती

'कॅप्टन कूल'ने घेतली कबड्डीमधून अचानक निवृत्ती

नवी दिल्ली : कॅप्टन कूल म्हणून क्रिकेट जगतामध्ये महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. त्याचबरोबर कबड्डीमध्ये अनुप कुमारला 'कॅप्टन कूल' असे म्हटले जाते. सध्या प्रो-कबड्डी लीग सुरु असून आपल्या घरच्या सामन्याच्यावेळी अनुपने आपली निवृत्ती जाहीर करत साऱ्यांनाच धक्का दिला आहे.

अनुपने भारतीय कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्याचबरोबर प्रो-कबड्डीमध्ये अनुपने सुरुवातीला यु मुंबा संघाचे कर्णधारपद भूषवले होते. सध्याच्या घडीला अनुप कुमार हा जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार होता. 

Web Title: Captain Cool gets sudden retirement from Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.