Asegaon's vaibhav kaithvas won gold medal in International Kabaddi | आसेगावचा वृषभ कैथवास आंतरराष्ट्रीय कबड्डीत चमकला
आसेगावचा वृषभ कैथवास आंतरराष्ट्रीय कबड्डीत चमकला

ठळक मुद्देआसेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

आसेगाव पूर्णा (अमरावती) : मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येथील डी.सी.पी. स्पोर्टींग क्लबचा कबड्डीपटू वृषभ मोहन कैथवास याने सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आसेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने गावकºयांनी त्याची वाजतगाजत मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला.
वृषभ (१८) हा स्थानिक स्व. दीपकराव चंद्रभानजी पेंढारकर (डी.सी.पी.) द्वारा संचालित डी.सी.पी. स्पोर्टींग क्लबचा कबड्डीपटू आहे. त्याने १८ ते २१ जानेवारी दरम्यान मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये भारताचे  उत्कृष्टरीत्या प्रतिनिधीत्व करून सुवर्णपदक पटकावले. त्या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, पाकिस्तान व मलेशियासह सहा देशांचा सहभाग होता. 
वृषभचे गावात आगमन होताच गावकरी व डी.सी.पी. क्लबच्यावतीने त्याचा सत्कार करून उघड्या जीपगाडीतून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला. याप्रसंगी क्लबचे संस्थापक तथा जिल्हा सचिव राहूल पेंढारकर, शैलेश गावंडे व क्रीडा मार्गदर्शक सेवकराव कोरडे, मोहन रघुवंशी, जितेंद्र मस्करे, भोला चव्हाण, ओमप्रकाश आंबेडकर परिसरातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.


Web Title: Asegaon's vaibhav kaithvas won gold medal in International Kabaddi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.