शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

झारा फॅशन ब्रॅण्ड आता विकतंय 'लुंगी', किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 11:37 AM

लुंगी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

मुंबई- भारतातील एखादी संस्कृती, पदार्थ, पेहराव, भाषा अशा विविध गोष्टींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणं, ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय कलेचाही जागतिक पातळीवर गौरव होणं, यासारखी कौतुकास्पद बाब कुठलंही नाही. यामध्येच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती गोष्ट म्हणजे लुंगी. गेल्या एक दोन दिवसांपासून भारताच्या बऱ्याच राज्यांमधील पोषाखांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ही लुंगी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे. यावेळी ही लुंगी ट्रेंडमध्ये येण्याचं कारण म्हणजे त्या लुंगीची किंमत आहे. 

 

भारतात फारशी ट्रेंडी न समजली जाणारी ही लुंगी परदेशात बरीच चर्चेत आली आहे.‘झारा’ या लोकप्रिय फॅशन ब्रँडमुळे ती चर्चेत आली आहे.  अगदी लुंगीप्रमाणे लूक असणाऱ्या या नव्या स्टाईलच्या लुंगीला हटके टच देण्यात आला आहे. स्कर्ट पॅटर्नमध्ये समोरच्या बाजूला स्लीट असणारी ही नव्या पद्धतीची लुंगी एक नवा ट्रेंड आहे. या नव्या ट्रेंण्डच्या लुंगीला चांगलीच पसंती मिळते आहे. पण जर ही नव्या ट्रेण्डची लुंगी तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सामान्य दुकानांमध्ये जास्तीत जास्त 300 किंवा 500 रूपयांना मिळते पण, ‘झारा’ ही फॅशनेबल लुंगी (स्कर्ट) ६९.९९ ब्रिटीश पाऊंडांना म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास ८२०० रुपयांना विकत आहे.

 

या नव्या ट्रेण्डच्या लुंगीची इतकी किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटिझन्सने झाराच्या या नव्या ट्रेण्डी लुंगीला ट्रोलही करायला सुरू केलं आहे.