ऐकावे ते नवलच.. स्कूटीवर सीट बेल्ट न घातल्याने युवकाला १ हजाराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 10:03 IST2023-05-05T10:03:08+5:302023-05-05T10:03:48+5:30
सीट बेल्ट न घातल्याबद्दल एक हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा मेसेज २७ एप्रिल २०२३ रोजी परिवहन विभागाकडून झा यांच्या मोबाइलवर आला

ऐकावे ते नवलच.. स्कूटीवर सीट बेल्ट न घातल्याने युवकाला १ हजाराचा दंड
बिहारमधील कृष्ण कुमार झा या स्कूटीचालकाला चक्क सीट बेल्ट न घातल्यामुळे १००० रुपये दंड ठोठावल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये कापलेले चालान तीन वर्षांनंतर मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठवले गेले.
सीट बेल्ट न घातल्याबद्दल एक हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा मेसेज २७ एप्रिल २०२३ रोजी परिवहन विभागाकडून झा यांच्या मोबाइलवर आला. तीन वर्षांपूर्वीचे चालान असून त्यासाठीचा दंड आधीच जमा झाल्याचा उल्लेखही मेसेजमध्ये होता. त्याने वाहतूक अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. ते चालान मॅन्युअली जारी करण्यात आले होते.
आम्ही या सर्वांचे ई-चालानमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत आहोत, चालान काही त्रुटीमुळे तयार केले गेले असावे, चूक कुठे झाली याचा तपास करत आहोत, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांमध्ये याची चर्चा रंगली आहे.