पाकमधील मॉलमध्ये तरुणाचा पंजाबी गाण्यावर डान्स, शिट्यांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 18:44 IST2018-07-10T18:42:38+5:302018-07-10T18:44:29+5:30
पाकिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही.

पाकमधील मॉलमध्ये तरुणाचा पंजाबी गाण्यावर डान्स, शिट्यांचा पाऊस
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही.
पाकिस्तानमध्ये बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. खासकरुन येथील लोक पंजाबी गाणी आवडीने ऐकतात. याचेच उदाहरण या व्हिडीओमधून समोर आले आहे. भारतासह पाकिस्तानमध्ये एक पंजाबी गाणे व्हायरल होत आहे. मन्नत नूर या चित्रपटातील 'Laung Laachi' गाणे आहे. या गाण्यावर नीरु बाजवा या तरुणाने डान्स केला आहे. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याचा डान्स पाहिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली आहे.
मेहरोज बेग नावच्या व्यक्तीने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ गेल्या रविवारी पोस्ट करण्यात आला. यानंतर हा व्हिडीओ अवघ्या दोन दिवसांत 48 हजार लोकांनी शेअर केला. तसेच, 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.