बाबो! आजही 'या' ठिकाणी वापरली जाते दगडांची नाणी, जाणून घ्या कसा करतात व्यवहार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:31 PM2019-12-10T13:31:26+5:302019-12-10T13:43:48+5:30

जगभरात नोटांचा आणि नाण्यांच्या वापर केला जातो. पण आजही एक ठिकाण असं आहे जेथील करन्सी दगड आहे आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Yap island where stone coins are still used | बाबो! आजही 'या' ठिकाणी वापरली जाते दगडांची नाणी, जाणून घ्या कसा करतात व्यवहार...

बाबो! आजही 'या' ठिकाणी वापरली जाते दगडांची नाणी, जाणून घ्या कसा करतात व्यवहार...

Next

(Image Credit : pinterest.com)

मनुष्य मुद्रेचा वापर पूर्वीपासून खरेदी-विक्रीसाठी करत आले आहेत. फक्त काळानुसार मुद्रेचं स्वरूप बदलत गेलं. एका काळात महागड्या रत्नांद्वारे व्यवसाय होत होता. लोक मोती, रत्न देऊ वस्तू खरेदी करायचे. नंतर नाण्यांचं चलन सुरू झालं. सोने, चांदी, तांबे, कांस्य आणि अ‍ॅल्यूमिनिअमपासून तयार केलेली नाणी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वापरण्यात आलीत. आता सगळीकडे नोटांचं चलन सुरू झालं. जगभरात नोटांचा आणि नाण्यांच्या वापर केला जातो. पण आजही एक ठिकाण असं आहे जेथील करन्सी दगड आहे आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.

(Image Credit : pinterest.com)

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, प्रशांत महासागरातील मायक्रोनेशियामध्ये यप नावाचं बेट आहे. या छोट्याशा बेटावर एकूण ११ हजार लोक राहतात. पण या शहराचं नावलौकिक इतकं आहे की, ११ व्या शतकातील इजिप्तच्या एका राजाकडून यपचा उल्लेख आढळतो. तसेच आणखीही काही लोकांनी यपबाबत सांगितलं आहे. या लोकांनी कुठेही 'यप' नावाचा उल्लेख केला नाही. पण जिथे दगडाच्या करन्सीचा वापर होतो, असा उल्लेख आहे.

(Image Credit : npr.org)

घनदाट जंगलं, दलदल असा चित्र असलेल्या या बेटावर जाण्यासाठी दिवसातून केवळ एकच फ्लाइट आहे. विमानतळाच्या बाहेर येतात लहान-मोठे दगड दिसतात. या दगडांच्या मधोमध छिद्र दिसतात. या बेटावरील माती भुसभुशीत आहे. पण तरिही इथे दगडाच्या करन्सीचं चलन पूर्वीपासून आहे. 

(Image Credit : alt-m.org)

आता ही करन्सी वापरणं कधी सुरू झालं हे कुणालाही माहीत नाही. पण स्थानिक लोक सांगतात की, पूर्वी येथील लोक चारशे किलोमीटर दूर डोंगरावरून हे दगड कापून आणायचे. या दगडांना राई म्हटलं जातं. पुढे १९व्या शतकात हे ठिकाण स्पेनच्या ताब्यात गेलं तेव्हाही दगडांचा व्यवहार काही थांबला नाही. आज केवळ नावाला या ठिकाणी अमेरिकन डॉलरचा वापर होतो. कारण येथील लोकांच्या मनात दगडांचं वेगळं महत्त्व आहे.

(Image Credit : wsj.com)

आजही या दगडांच्या या करन्सीचा वापर लोक रोजच्या देवाण-घेवाणीसाठी करत नाहीत. पण यांचा वापर माफीनाफे किंवा कधी लग्नसंबंध मजबूत करण्यासाठी हे दगड दिले जातात. दगडांच्या या नाण्यांचा आकार सात सेंटीमीटर ते ३.६ मीटर इतका असतो. यांचं मूल्य ते कोणत्या कामासाठी वापरले जातात किंवा कुणाला दिले जातात यावरून ठरतं. 

(Image Credit : rushkult.com)

गेल्या २०० वर्षांपासून दगडांच्या करन्सीचा इतिहास नव्या पिढीला तोंडी सांगितला जातो. आता दगडांची नाणी म्युझिअममध्ये ठेवली आहेत. आजही काही नवीन दगडांची नाणी तयार केली जातात. पण प्रमाण कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही नाणी चोरी जाण्याची भिती नाही. कारण यांचा आकारही मोठा आहे आणि चोरी करून नेणार कुठे असाही प्रश्न आहे. 


Web Title: Yap island where stone coins are still used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.